पोलीस व्हॅनमध्येच बलात्कार


महिला कैद्यावर दोन कैद्यांचाच बलात्कार

Advertisement

रोहतक :
एका महिला कैद्यावर पोलीस व्हॅनमध्ये कैद्यांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैद्यांकडून महिला कैद्यांवर बलात्कार केला जात असताना पोलीस कर्मचारी कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यामध्ये गुंतले होते.
या प्रकरणी दोन आरोपींवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीप्रमाणे तिच्यावर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू होते. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी मला तिथं नेलं होतं. तेव्हा सोबत आणखी दोन कैदी होते. उपचारानंतर पोलीस कागदपत्रांचे काम पूर्ण करत होते. त्यावेळी व्हॅनमध्ये कैद्यांनी बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे.
पीडितेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, पोलीस कागदपत्रांच्या कामात असताना आरोपींनी मला कोल्ड्रिंक प्यायला दिलं. त्यानंतर दोन्ही कैद्यांनी व्हॅनमध्येच बलात्कार केला. पोलीस कागदपत्रांच्या कामात असल्याचं पाहून कैद्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित महिला कैद्याने म्हटलंय.
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये गुन्ह्याच्या तारखेचा उल्लेख नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी तिने नैराश्यातून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपाची शहानिशा केली जात असून अधिक तपास केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!