योगविद्याधामच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन
सातारा
योगविद्या धाम सातारा संस्था ही सातारा जिल्ह्यात योग प्रचार व प्रसार करणारी, तसेच महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आयुषमान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्स चालवणारी संस्था आहे. गेल्या वर्षी या संस्थेने रौप्य महोत्सव साजरा केला यानिमित्ताने वर्षभर योगविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले.यंदाचा जागतिक योग दिवस संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
सातारा शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोफत योग वर्ग घेतले गेले. कोरेगाव, वाई, फलटण, खंडाळा, सांगली, कराड, आमनापूर, शहापूर. अशा विविध ठिकाणी संस्थेच्या योग शिक्षकांनी वर्ग घेतले.विविध शाळा, संस्था, महाविद्यालये, कार्यालये, वसाहतींमध्ये हे वर्ग नि: शुल्क घेण्यात आले.
यामध्ये काही एक दिवसीय, एक आठवडा , पंधरा दिवस कालावधींचे वर्ग घेतले गेले.या प्रशिक्षणाचा लाभ हजारो योग प्रेमींनी घेतला.या जागतिक योग दिनानिमित्त योगविद्या धाम सातारा संस्थेच्या वतीने व्यासंग योगासन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू होत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा शैलजा ताई ठोके यांनी सांगितली. सदर मार्गदर्शन केंद्रात नऊ वर्षापुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी मार्गदर्शन मिळेल तसेच स्पर्धेसाठी सरावही करुन घेतला जाईल अशी माहिती दिली.
अधिकाधिक योगप्रेमींनी यांचा फायदा करून घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
