हज यात्रेत 550 जणांचा उष्माघाताने मृत्यू


उष्णतेचा कहर, तापमानाचा पॅरा 52 अंशावर
रियाध
हज यात्रा ही मुस्लिम समुदयासाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अशी धार्मिक यात्रा असते.यंदाच्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. उष्णतेची लाट आणि उष्माघातामुळे आतापर्यंत 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं आणि हजारो नागरिक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे.मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतकांमध्ये 323 नागरिक हे इजिप्तचे तर 60 नागरिक जॉर्डनचे असल्याची माहिती समोर आली आहे. तर काही नागरिक हे इंडोनेशिया, सेनेगल येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सौदी अरेबिया येथील तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि याच उष्णतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सौदी अरेबियामधील सरकारी टीव्हीने सांगितले की, मक्का येथील ग्रँड मशिदीच्या शेडमधील तापमाना सोमवारी 51.8 अंश सोल्सिअस नोंदवण्यात आले होते. उष्णतेच्या लाटेमुळे हज यात्रेसाठी आलेल्या नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं एक आव्हान बनलं आहे.
जिओफिजिकल रिसर्च लेटर्सच्या 2019 मधील एका रिसर्चमध्ये सांगितले होते की, हवामान बदलामुळे आणि वाढत्या तापमानामुळे सौदी अरेबियात हज यात्रेकरूंना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. यंदाच्या वर्षी अतिउष्णतेमुळे मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच उष्णतेमुळे अनेक नागरिकांना त्रास होत असून उपचारासाठी रुग्णालयात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. तापमानाचा पारा अशाच प्रकारे वाढत राहिला तर भविष्यात वयोवृद्ध नागरिकांना हज यात्रेला जाणं अवघड होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!