६५ वर्षांनंतरही आता आरोग्य विमा
सरकारने केला महत्वाचा बदल
नवी दिल्ली
आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे आणि पॉलिसी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा काढून टाकण्यात आली आहे.आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार आहे. जर तुमचे पालक वृद्ध असतील आणि त्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आता ते तुमच्यासाठी शक्य होणार आहे. खरं तर विमा नियामक भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आणि पॉलिसी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी ग्राहक केवळ ६५ वर्षे वयापर्यंत नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकत होते. परंतु आता ज्येष्ठ नागरिक त्यांचे वय ८० किंवा ९० वर्षे असले तरीही ते आता आरोग्य विमा खरेदी करू शकणार आहेत. ६५ वर्षांवरील सर्व भारतीयांसाठी हा मोठा दिलासा आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने विमा कंपन्यांना त्यांच्या नेहमीच्या आरोग्य पॉलिसी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने वयाच्या ६५ व्या वर्षी आरोग्य विमा खरेदी करण्याची कमाल मर्यादा घातली होती. त्यामुळे आरोग्य तपासणी आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी कोणतेही कवच नसल्याने अनेकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. एखादा ग्राहक कितीही निरोगी असला तरीही विशिष्ट वयानंतर आजार होण्याची शक्यता वाढते, असेही सांगितले जाते.
सर्वसाधारणपणे ज्यांना कोणतीही वैद्यकीय समस्या नाही, त्यांनी १०० टक्के बिल पेमेंट आणि लहान किंवा कोणतीही व्यापक विमा सुरक्षा पॉलिसी खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे. आरोग्य समस्या असलेल्या ग्राहकांनी विविध विमा कंपन्यांच्या पर्यायांचे मूल्यमापन केले पाहिजे. तसेच सुरक्षा आणि खर्चाचा सर्वोत्तम पर्याय निवडला पाहिजे. त्यांनी नेटवर्क कव्हरेज, रूम भाड्याची मर्यादा, रोगावरील खर्च, उपभोग्य विमा सुरक्षा आणि इतर पॉलिसी अटी आणि शर्तींचा विचार केला पाहिजे, ज्यामुळे दाव्याच्या वेळी पैसे कमी होऊ शकतात,
