भाजपाची महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा


देवेंद्र फडणवीसच राज्यात पक्षाचे नेतृत्व करणार
मुंबई
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे,अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.देवेंद्र फडणवीसच राज्यात पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले
नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू असंही त्यांनी सांगितले.
लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली.त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!