अनंत-राधिका यांच्या लग्नाची तारीख ठरली
12 जुलै रोजी पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने विवाह
मुंबई,
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचे लग्न 12 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने होणार आहे.शुक्रवार, 12 जुलै रोजी शुभ विवाह सोहळ्याने मुख्य विवाह सोहळ्याची सुरुवात होईल. शनिवार, 13 जुलै हा शुभ आशीर्वादाचा दिवस असेल. रविवार, 14 जुलै रोजी मंगल उत्सव किंवा लग्नाचा रिसेप्शन असेल.
लग्नाआधी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडपासून ते परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्याच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान-सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली, अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरिना कैफसह अनेक स्टार्सची नावे आहेत.याशिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचा भाग होण्यासाठी भारतात येऊ शकतात. अनंत अंबानी आणि त्यांची भावी वधू राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग फंक्शन युरोपमध्ये आयोजित करण्यात आला आहे. क्रूझवर लग्नापूर्वी हे कपल एका भव्य पार्टीचा आनंद घेत आहे.
