ममता बॅनर्जी पुन्हा जखमी
हेलिकॉप्टरमध्ये चढताना पडल्या
कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारादरम्यान पुन्हा एकदा जखमी झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ममता पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला पोहोचल्या होत्या.त्यावेळी हा अपघात झाला
दुर्गापूर याठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये चढताना हा अपघात झाला.ममता हेलिकॉप्टरमध्ये चढताना घसरल्या. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरच्या आत पडल्या. या अपघातात ममता किरकोळ जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ममता दुर्गापूरहून आसनसोलला जाण्यासाठी हेलिकॉप्टरची वाट पाहत होत्या वर जाण्यासाठी त्याच्या बाहेर पायऱ्या लावण्यात आल्या होत्या आणि हेलिकॉप्टरच्या आत बसण्यासाठी त्या चढून जावे लागत होते.
ममता ही शिडी चढून हेलिकॉप्टरमध्ये चढणार होत्या पण तेवढ्यात त्यांचा पाय हेलिकॉप्टरच्या गेटवर घसरला . मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उचलले. या अपघातात ममता किरकोळ जखमी झाल्या आहेत.
