रविवार खाद्ययात्रा
मेथी मुठिया

मेथी मुठिया हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा.
साहित्य
1 जुडी मेथी 200 ग्राम गहू पीठ 50 ग्राम बेसन पीठ 2 चमचे रवा 2 चमचे तांदळाचे पीठ 1/4 वाटी दही
1 चमचा हळद 2 चमचे बारीक केलेला लसूण 4 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 चमचे सफेद तीळ
1 चमचा ओवा 1 चमचा हिंग1 चमचा साखर चवीपुरते मीठ तळण्यासाठी तेल
कृती
मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी.वरील सर्व पीठे एकत्र करून त्यामध्ये चिरलेली मेथी व सर्व साहित्य घालून पीठ मळून घ्यावे.
दहा मिनिटांनी तेलाचा हात लावून लंबाकार आकार करून मुठिया बनवून घ्यावे.गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये तेल घालून मंद आचेवर मुठिया खरपूस
तळून घ्यावे.गरमागरम मेथी मुठिया साॅस किंवा दही, अथवा चटणी बरोबर सर्व्ह करावे अप्रतिम चवीचे मेथी मुठिया तयार.
