मानसिक स्वास्थ्य समृद्ध करण्यासाठी भावनेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे: डॉ. गणेश लोखंडे


सातारा
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे प्रा.डॉ. गणेश लोखंडे क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट यांचे मार्गदर्शन लाभले यांनी आपल्या भाषणात तरुणांनी भावनेवर नियंत्रण ठेवावे मत्सर व तुलना त्याच्यापासून अलिप्त रहावे स्वतःचे गुण ओळखून स्वतःचे अवगुण नियंत्रित ठेवावे असे बहुमोल मार्गदर्शन केले.

Advertisement

आज जगामध्ये मानसिक स्वास्थ्य शारिरीक आरोग्यापेक्षा महत्त्वाचे आहे हे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थी जीवनामध्ये सकारात्मक विचार याची ऊर्जा तुम्हाला समृद्ध जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. बी एस सावंत यांनी सामाजिक व भावनिक शिक्षण हे जीवनमूल्यसाठी गरजेचे असलेले सांगितले आज तरुण वर्ग मोबाईलच्या मोहामध्ये गुरफटलेला असल्याने एकटा पडत आहे समाजाशी सुसंवाद व त्यासाठी संवादकौशल्य वाढवणे गरजेचे आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत ज्ञान उपलब्ध आहे पण या ज्ञानाबरोबरच भावनिक बुद्ध्यांक वाढणे हे गरजेचे आहे कारण भावनेवर नियंत्रण अपयश पचवणे या बाबी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतात आत्महत्या हा पर्याय नाही हे ह्या मानवी मनावर आपण चांगल्या पद्धतीने बिंबवणे आजच्या काळाची गरज आहे सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून भावनेवर नियंत्रण ठेवावे व चांगले आणि वाईट यातील फरक ओळखून आपले जीवन समृद्ध करावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर स्तवनाने झाली व कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापिका प्रीती श्री यांनी केली व कार्यक्रमाचे आभार रोहिणी थोरात यांनी मांडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!