कृष्णा परिक्रमेमध्ये संस्कृतीचा अभ्यास महत्त्वाचा:डॉ वारुंजीकर


उमेद ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विशेष व्याख्यान

सातारा
कृष्णा किंवा कोणत्याही नदीची परिक्रमा पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहेच. पण या परिक्रमेच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक संस्कृतीचा अभ्यास करणे आणि जनसंवाद साधणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कृष्णा परिक्रमा पूर्ण केलेले डॉक्टर मुरलीधर
वारुंजीकर यांनी केले. येथील उमेद ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस होते. व्यासपिठावर उमेद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कानेटकर, उपाध्यक्ष गोपाळ खजुरे, कार्याध्यक्ष दिलीप चरेगावकर उपस्थित होते. डॉक्टर वारुंजीकर पुढे म्हणाले,कृष्णा नदीची परिक्रमा एक मोठे आव्हान आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कृष्णा नदीचा सागर संगम आंध्र प्रदेशात समुद्रकिनारी होतो. सुमारे पंधराशे किलोमीटरचा हा प्रवास परिक्रमेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी कमाल पाच वर्षेही लागू शकतात
दृढ निश्चय आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावरच ही परिक्रमा पूर्ण करता येऊ शकते.

कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या चार राज्यातून जाऊन समुद्राला मिळत असल्याने या चारही राज्यातील संस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी आणि तेथील लोकांशी संवाद साधण्याची चांगली संधी या परिक्रमेच्या कालावधीमध्ये उपलब्ध होते ,असेही डॉक्टर वारुंजीकर म्हणाले.
यावेळी त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून या परिक्रमेची संपूर्ण माहिती दिली.

Advertisement

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरिष चिटणीस यांनी उमेद जेष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले

कार्यक्रमाच्या प्रारंभी रामकृष्ण सेवा मंडळाच्या शुभदा अत्रे,साधना कुलकर्णी ,प्रज्ञा मुतालिक साधना बोकील ,सुजाता कानेटकर यांनी कृष्णा लहरी हे स्तोत्र सादर केले. डॉक्टर मुरलीधर
वारुंजीकर यांचा परिचय विश्वास लिमये यांनी करून दिला.डॉक्टर वारुंजीकर यांचा सत्कार अध्यक्ष अशोक कानटकर यांच्या हस्ते करण्यात आला. शिरीष चिटणीस यांचा परिचय विजय फडणीस यांनी करून दिला. त्यांचा सत्कार गोपाळ खजुरे यांनी केला .उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य अरविंद माळी यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. त्यांचा परिचय प्रकाश येळगावकर यांनी करून दिला. अशोक कानेटकर आणि सुजाता कानेटकर यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. या दांपत्याचा परिचय दत्तात्रय देगावकर यांनी करून दिला. त्यांचा सत्कार शिरिष चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आला .

अशोक कानेटकर यांनी आपल्या भाषणामध्ये संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि संघाला आर्थिक मदत म्हणून आपल्या दोन्ही मुलांच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची देणगी घोषित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद फडके यांनी केले. त्यांनीच आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

फोटो ओळ
उमेद ज्येष्ठ नागरिक संघाला देणगीचा चेक देताना अशोक कानेटकर, सुजाता कानेटकर, शेजारी शिरिष चिटणीस,डॉ.मुरलीधर
वारुंजीकर,दिलीप चरेगावकर,गोपाळ खजुरे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!