रविवार पॉझिटिव्ह


नॉर्वे मध्ये 80 टक्के मोटारी इलेक्ट्रिक
 इंधनावरील खर्चात बचत,प्रदूषणही झाले कमी
ओस्लो
 भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक  वाहनांची प्रसिद्धी केली जात आहे इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक फायदे असून या फायद्यांचा लाभ सर्वात जास्त नॉर्वे या देशाने घेतला आहे नॉर्वे मध्ये सध्या रस्त्यावर धावणाऱ्या 80% मोटारी इलेक्ट्रिक आहेत
गेल्या काही वर्षापासून नॉर्वे सरकारने जाणीवपूर्वक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या इंधनाच्या खर्चात बचत झाली आहेच शिवाय प्रदूषणाचे प्रमाणही 30% कमी झाले आहे नॉर्वे देशातील पेट्रोल आणि डिझेल पंप जवळजवळ संपुष्टात आले आहेत आणि त्यांची जागा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सने घेतली आहे 2025 पर्यंत नॉर्वेत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनाना रस्त्यावर फिरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात येणार आहे 1995 पासूनच नॉर्वे सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावतील असे धोरण स्वीकारले होते या धोरणाचा आढावा घेण्यात आला तेव्हा देशातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे लक्षात आले पेट्रोल आणि डिझेल पंप बंद झाल्यामुळे देशात बेरोजगारी वाढेल अशी शंका काही तज्ञांनी व्यक्त केली होती पण तशी कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही आणि पेट्रोल आणि डिझेल पंपांची जागा चार्जिंग स्टेशन्स घेतल्यामुळे तेथे रोजगार वाढल्याचे लक्षात आले वीजपुरवठा खंडित झाला तरीसुद्धा इलेक्ट्रिक वाहने अडचणीत येऊ शकतात असा एक आक्षेप घेण्यात येत होता पण ती परिस्थिती पण गेल्या काही वर्षात उद्भवलेली नाही आता तर फक्त इलेक्ट्रिक वाहनांना वीज उपलब्ध व्हावी म्हणून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन उभारण्याकडे नॉर्वे सरकारने लक्ष दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!