रविवार हास्यजत्रा
चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात
सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय
माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो
तरी इतका फिटनेस
चिंग टिंग पिंग ऑईल
चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी
तर फिटनेसची चिंता डोंट वरी
फास्ट फूड
दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……
दारुगोळा
व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात, एक सासरचा, एक माहेरचा..
पुरुष आपल्या सासरच्या ग्रुपवर अत्यंत गप्प आणि उदासीन असतात, अधूनमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एखादा पाचकळ विनोद सोडला तर ते ना पोस्ट वाचतात ना काही लिहितात.
स्त्रियाही आपल्या सासरच्या ग्रुपवर काही लिहीत नाहीत, अधूनमधून फॉरवर्ड टाकतात, पण बारकाईने वाचत मात्र असतात शिवाय आपल्या नणंद, जावा, चुलत-आते सासवा वगैरे खास प्रेमाच्या माणसांचे बदललेले DP नक्की पाहत असतात.
याला पुढच्या युद्धासाठी दारुगोळा जमा करणे म्हणतात..
