सूर्यकुमारचा अफलातून झेल
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट
बार्बाडोस
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले.
अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पण नंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आणले. यानंतर हार्दिक पांड्याने हेन्रिक क्लासेनची अत्यंत आवश्यक विकेट घेतली. पण सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला तो डेव्हिड मिलरचा झेल जो सूर्यकुमार यादवने अप्रतिमपणे झेलला.
https://x.com/MrSinha_/status/1807115046448730259
शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. यावेळी डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. जवळपास मिलर यशस्वी देखील झाला. मात्र सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत येऊन चेंडू पकडला. पण तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जर त्याला झेल ऐवजी षटकार मिळाला असता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला असता आणि टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग झाले असते.
