मंगळवारी आकाश दर्शनाची संधी
रयत सायन्स सेंटरतर्फे आणखी एक उपक्रम
सातारा
येथील रयत सायन्स आणि इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स अँड ऍस्ट्रोफिजिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी संध्याकाळी सात ते दहा या कालावधीमध्ये अप्पासाहेब पाटील रयत इंग्लिश मीडियम स्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमात भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रयत सायन्स सेंटरचे इन्चार्ज डायरेक्ट सारंग भोला क्युरेटर सचिन सोनुले यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफचे प्रिन्सिपल डॉक्टर बी टी जाधव डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचे प्रमुख डॉक्टर ए पी तोरणे यांनी केले आहे आकाश दर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आकाशाची ओळख होणार असून आकाशातील विविध तारका समूहांची माहिती मिळणार असल्याचे डॉक्टर सारंग भोळा यांनी सांगितले
