१२ लाखांपर्यंत उत्पन्नावर कराचा बोजा नाही


करदात्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा!
मुंबई
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आता १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कराचा बोजा असणार नाही . तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना हे मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमर्गींना दिलासा देण्यासंदर्भात संकेत दिले होते. १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ८० हजारांपर्यंत फायदा होणार आहे.
यामुळे वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला ८० हजार रुपयांची करात सूट मिळेल. याचा अर्थ, त्याचा १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा फायदा होईल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर कमी होईल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा १ लाख २५ हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला २५ टक्के कर कमी भरावा लागेल.
नव्या करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असल्यास आयकर भरावा लागणार नाही.
अशी असेल कर रचना…
० ते ४ लाखांवर कर नाही
४ ते ८ लाखांवर ५ टक्के कर
८ ते १२ लाखांवर १० टक्के कर
१२ ते १६ लाखांवर १५ टक्के कर
१६ ते २० लाखांवर २० टक्के कर
२० ते २४ लाखांवर २० टक्के कर
२४ लाखांच्या पुढे ३० टक्के कर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!