भास्कर जाधव नाराज
ठाकरे गटाच्या प्रचारसभांना दांडी
रत्नागिरी:
लोकसभा निवडणुकीसाठी सध्या कोकणात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. गेल्या काही काळापासून भास्कर जाधव हे कोकणात पूर्वीसारखे सक्रिय नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
भास्कर जाधव हे कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचारात नेहमीच्या हिरीरिने भाग घेताना दिसत नाहीत. गुहागर विधानसभा मतदारसंघातील चारही सभांना भास्कर जाधव यांनी दांडी मारली आहे. घरी पुतण्याची हळद उतरणी असल्याचे कारण पुढे करत भास्कर जाधव यांनी पुढे केले आहे. जाधव यांनी अनंत गीते यांच्या प्रचाराकडेही सपशेल पाठ फिरवल्याची कुजबुज ठाकरे गटात सुरु आहे. त्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
