पत्नीसमोरच पतीचा महिलेवर बलात्कार


धर्म बदलण्यास पाडलं भाग,सात जणांविरुद्ध गुन्हा

Advertisement

बंगळुरू : आपल्या पत्नीसमोरच एका पतीने दुसऱ्या महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिला धर्म बदलण्यास भाग पडल्याची घटना घडली असून याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपीने आपल्या पत्नीसमोरच तिच्यावर बलात्कार केला आणि तिला बुरखा घालण्यास भाग पाडलं. यासोबतच तिच्या कपाळावर कुंकू पुसण्यास भाग पाडलं. आरोपी रफिक आणि त्याच्या पत्नीने पीडित महिलेचा विनयभंग करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. त्यानंतर तिचे फोटो काढण्यात आले, ज्याद्वारे त्याने पीडित महिलेला ब्लॅकमेल करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं.
पोलिसांनी सांगितलं की, रफिक आणि त्याच्या पत्नीने 2023 मध्ये महिलेला बेळगाव येथे त्यांच्या घरात राहण्यास भाग पाडलं. तसंच जे काही सांगेल त्याचे पालन करायचं, असं तिला सांगितलं. महिलेचा आरोप आहे की, गेल्या वर्षी ते तिघे एकत्र राहत असताना रफिकने पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला होता. बेळगावचे एसपी भीमाशंकर गुलेडा यांनी सांगितलं की, त्याच महिन्यात या जोडप्याने महिलेला ‘कुंकू’ न लावण्यास सांगितलं. तिला बुरखा घालण्यास आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यास भाग पाडलं. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, रफिकने तिला तिच्या पतीला घटस्फोट देण्यास सांगितलं आणि धमकी दिली की जर तिने त्याचं पालन केलं नाही तर तो तिचे इंटिमेट फोटो लीक करेल. धर्मांतर न केल्यास जीवे मारण्याची धमकी या जोडप्याने दिल्याचे तिने सांगितले. महिलेच्या तक्रारीवरून सौंदत्ती येथील सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!