एकाचवेळी सहा मुलांना जन्म
इस्लामाबाद
पाकिस्तानातील 27 वर्षीय महिलेने एकाचवेळी सहा मुलांना जन्म दिला. रावळपिंडीच्या जिल्हा रुग्णालयात हजारा कॉलनीत राहणाऱया मोहम्मद वहीद यांची पत्नी जीनत वहीद यांना प्रसूती वेदना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.एका तासानंतर त्यांनी सहा मुलांना जन्म दिला. यात चार मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. सर्व नवजात बालके आणि त्यांची आई सर्व जण सुरक्षित आहेत
