कोवळी सकाळ पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
सातारा
चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि श्रीराम नानल यांनी लिहिलेल्या कोवळी सकाळ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे आहे. आम्ही पुस्तकप्रेमी समूह, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि चपराक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये टाटा टेली सर्विसेसचे माजी अध्यक्ष व सल्लागार माधव जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे संस्थापक डॉक्टर संदीप श्रोत्री, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, जेष्ठ पत्रकार व लेखक मुकुंद फडके , चपराक प्रकाशनचे संचालक घनश्याम पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर करणार आहेत. सर्वांनी या प्रकाशन सोहळा उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम नानल आणि विनायक भोसले यांनी केले आहे

