नो पॉलिटिक्स इन ऑफिस
28 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर गुगलचा कर्मचाऱ्यांना संदेश
न्यूयॉर्क
टेक कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणापासून (ऑफिस) राजकारण दूर ठेवण्यास सांगितले आहे. गुगलमधून 28 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.यामध्ये त्यांनी एकप्रकारे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करावे, राजकारणात पडू नये, असे आदेश दिले. ‘मिशन फर्स्ट’ शीर्षकाच्या त्यांच्या नोटमध्ये पिचाई म्हणाले – कंपनीचे धोरण आणि अपेक्षा स्पष्ट आहेत. कार्यालयात राजकारणाला स्थान नाही.
काही कर्मचारी कंपनीच्या $1.2 बिलियन निंबस प्रकल्पाला विरोध करत होते यामध्ये इस्त्रायली सरकार आणि लष्कराला क्लाउड सेवा पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गुगलच्या न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि सनीवेल शहरांतील कार्यालयांमध्ये तास न् तास या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. त्यांनी स्वतःला आवारातून बाहेर काढले जात असल्याचे थेट प्रक्षेपण केले होते. यानंतर गुगलने 28 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.
पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘गुगलची संस्कृती नेहमीच खुल्या संवादाला प्रोत्साहन देणारी राहिली आहे. हेच आम्हाला उत्कृष्ट उत्पादने तयार करण्यास आणि चांगल्या कल्पनांवर कृती करण्यास सक्षम करते. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि येथे काही धोरणे आणि अपेक्षा स्पष्ट आहेत.आम्ही व्यवसायासाठी काम करतो. त्यामुळे ऑफिस हे असे ठिकाण नाही की जिथे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणून त्यांना असुरक्षित वाटू शकता. कर्मचाऱ्यांनी तर्कशुद्ध राहिले पाहिजे. जगाची माहिती व्यवस्थित करणे आणि जगाला विश्वसनीय माहितीचा प्रदाता राहणे, हे आमचे ध्येय आहे
