साताऱ्यात मंगळवारी बर्मन बिट्स कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था सुहाना सफर ग्रुपतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे बर्मन बिट्स हा कार्यक्रम होणार आहे
एस डी बर्मन आणि आर डी बर्मन या पिता पुत्रांनी संगीतबद्ध केलेल्या हिट गीतांचा बहारदार नजराणा या कार्यक्रमामध्ये सादर केला जाणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्याम बडवे दिलीप चरेगावकर शहाबुद्दीन शेख मुकुंद फडके विजय साबळे शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे असून कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर सुहास पाटील व चंद्रशेखर बोकील करणार आहेत ध्वनी व्यवस्था सचिन व अक्षता शेवडे सांभाळणार आहेत
या कार्यक्रमामध्ये शिरीष खुटाळे, सचिन शेरकर, चंद्रशेखर बोकील, डॉक्टर सुनील पटवर्धन, डॉ. सुहास पाटील,राजेंद्र देशमाने ,मिलिंद हर्षे, धीरेंद्र राजपुरोहित, गणेश शिंदे, वनिता कुंभार, सुषमा बगाडे ,स्मिता शेरकर, ममता नरहरी ,सीमा राजपूत मंजिरी दीक्षित दिपाली घाटगे, स्वाती मोरे हे कलाकार गाणी सादर करणार आहेत
सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस व विजय साबळे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!