अश्वमेध ग्रंथालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर
रविवार १७ ऑगस्ट रोजी वितरण समारंभ
सातारा
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा यांच्यावतीने देण्यात येणारे कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ अक्षर गौरव पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आले आहेत याबाबतची माहिती अश्वमेधचे संस्थापक, माजी नगरसेवक डॉ. रविंद्र भारती व अध्यक्ष साहित्यिक डॉ राजेंद्र माने यांनी दिली आहे.
यामध्ये कै भास्करराव माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार (अडीच हजार रुपये रोख व स्मृती चिन्ह )
ब्युटी ऑफ लाईफ – आत्मकथन लेखिका आशा नेगी आणि दिशांतर -गझल संग्रहा कवयित्री . डॉ स्नेहल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे
इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे
कै भास्करराव माने सृत्यर्थ अक्षर गौरव विशेष पुरस्कार ( एकहजार रोख व स्मृती चिन्ह)
१)मायबोली रंग कथांचे – संपादन
ले – सचिन वसंत पाटील
२) विश्वावसूची निरूपणे – ललितगद्य
ले – विश्वास वसेकर
३) जामीनावर सुटलेला काळा घोडा
-कविता संग्रह
कवी – धनाजी धोंडीराम घोरपडे
४) रंध्रात भिनावा छंद – कवितासंग्रह
कवयित्री – कांचन सावंत
५) व्हाईट टॉर्चर – अनुवाद
अनुवादिका – राजश्री शहा
६) दरवळ सोनचाफ्याचा -कवितासंग्रह
कवयित्री – डॉ संजीवनी तोफखाने
कै भास्करराव माने स्मृत्यर्थ सातारा जिल्ह्यातील लेखकांच्यासाठी ‘अक्षर गौरव प्रेरणा ‘पुरस्कार
१) रेडी ते रेवस -प्रवास वर्णन
ले – सुनील शेडगे
२) किनारे सावल्यांचे -ललित गद्य
ले – शुभदा कुलकर्णी
३) आठवणींच्या सावल्या – ललित गद्य
ले – प्रा विश्वजीत जाधव
४) टरफल – एकांकिका संग्रह
ले – राजीव मुळे
५) शिवरायांचे थोरले बंधू -संभाजीराजे
ऐतिहासिक
ले – राजेंद्र घाडगे
६) प्रकाशरेषा – व्यक्तीचित्रण
ले – श्रीकांत कात्रे
७) जादूची छडी – बाल वाङमय
ले . – ॲड .संगीता केंजळे
डॉ श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ
आरोग्य विषयक पुस्तकासाठी
‘ अक्षर गौरव पुरस्कार 2024 ‘
१) निसर्गाचे गोड गुपित – यौवनस्पर्श
ले – डॉ मोहन सुखटणकर
पुरस्कार वितरण पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, यांचे हस्ते व
संवाद, पटकथा लेखक श्री. विशाल कदम, यांचे प्रमुख उपस्थितीत दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी ४.३० वाजता, सोमण सभागृह राजवाडा सातारा येथे होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष शशिभूषण जाधव यांनी दिली.

