केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा
नामांकित उद्योगसंस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध
सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 माजी विद्यार्थी मेळावा व नोकरी मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश माजी विद्यार्थ्यांशी स्नेहबंध दृढ करणे तसेच विद्यमान विद्यार्थ्यांना नामांकित उद्योगसंस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
इन्स्टिट्यूटमध्ये बीसीए,बीबीए व एमबीए या अभ्यासक्रमांद्वारे व्यवस्थापन व संगणक क्षेत्रातील सर्व कार्यात्मक शाखामधील गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. इन्स्टिट्यूट चे माजी विद्यार्थी विविध नामांकित उद्योग, कॉर्पोरेट संस्था आणि उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. माजी विद्यार्थी मेळावा माध्यमातून त्यांचे अनुभव, यशोगाथा व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
नोकरी मेळावामध्ये विविध प्रतिष्ठित कंपन्यांचा सहभाग अपेक्षित असून, अंतिम वर्षातील तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. उद्योग-शिक्षण दुवा अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
माजी विद्यार्थी मेळावा हा केवळ स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नसून तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, मार्गदर्शन आणि संधी यांचा संगम आहे. नोकरी मेळावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्याची सुवर्णसंधी मिळेल. सर्व माजी विद्यार्थी, उद्योगप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. बी . एस. सावंत यांनी केले
यानिमित्ताने प्रख्यात प्रेरणादायी वक्ता व इन्स्टिट्यूट चा माजी विद्यार्थी सौरभ भोसले यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

