रयत सेंटरतर्फे लिक्विड नायट्रोजन शो


25 एप्रिलला आयोजन,नायट्रोजन शो सर्व वयोगटासाठी खुला
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स आणि इनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी लिक्विड नायट्रोजन शोचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत होणारा हा शो सर्व वयोगटातील लोकांसाठी खुला आहे यावेळी लिक्विड नायट्रोजनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे रयत सेंटर मध्ये विज्ञानाशी संबंधित अनेक गोष्टी असून त्या पाहण्याचा आनंदही या कालावधीमध्ये उपस्थिताना घेता येणार आहे या शोमध्ये भाग घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी सेंटरचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर सारंग भोला किंवा क्युरेटर सचिन सोनुले यांच्याशी संपर्क साधावा वर्ये तालुका सातारा येथे हे सायन्स सेंटर असून गेल्या काही कालावधीमध्ये ते अबालवृद्धांचे आकर्षण ठरले आहे उन्हाळी सुट्टीमध्ये या सेंटर तर्फे आणखीही काही उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सारंग भोला यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!