सोने चांदीची पाणी पुरी
सोशल मीडियावर पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल
अहमदाबाद
पाणी पुरी हा शब्द जरी ऐकला तरी तोंडाला पाणी सुटते. पाणी पुरीचे अनेक प्रकार ऐकले असतील किंवा खाल्ले असतील पण कधी सोन्या चांदीची पाणी पुरी खाल्ली आहे का? सध्या सोशल मीडियावर अशाच एका सोन्या चांदीच्या पाणीपुरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गुजरात येथील अहमदाबादच्या एका विक्रेत्याने पाणी पुरीचे नवीन व्हर्जन शोधून काढले आहे. या पाणीपुरीमध्ये सुका मेवा आणि थंडाईचा समावेश केला जातो आणि ही पाणी पुरी सोनेरी प्लेटमध्ये पाणी पुरीवर सोने चांदीच्या कोटींग करून सर्व्ह केली जाते. सध्या या पाणीपुरीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. काही लोकांनी या क्रिएटिव्हीटीचे कौतुक केले आहे तर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये व्लॉगर्स खूशबू आणि मनन या नवीन पाणी पुरी विषयी माहिती देतात. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे – पाणी पुरीमध्ये बदाम, काजू आणि पिस्ता टाकताना दिसत आहे. त्यानंतर त्यात मध सुद्धा टाकताना दिसतात. शेवटी ग्लासमध्ये थंडाई टाकतात आणि प्रत्येक पाणी पुरीला सोन्या चांदीची कोंटीग करतात आणि ही पाणी पुरी सोनेरी ताटात सर्व्ह केली जाते. शेअरइट असे या पाणी पुरीच्या गाड्याचे नाव आहे. सध्या या पाणी पुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्लॉगर्स खूशबू आणि मनन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सोने-चांदीची पाणी पुरी! शेअरइट ही देशातील पहिली स्वच्छ लाइव्ह फ्राइड पाणी पुरी आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही दहा रुपयांमध्ये चार पाणी पुरी खाणारे लोक आहोत. तर एका युजरने लिहिलेय, “याला बप्पी लहरी पाणी पुरी म्हणा” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा, किंमत पण सांग” अनेक युजर्सना पाणी पुरीचा हा प्रकार आवडला नाही. त्यामुळे अनेकांनी व्हिडीओ पाहून टिका सुद्धा केली आहे
