नोबेल साहित्य दर्शन ग्रंथाचे सोमवारी लोकार्पण
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पुणे येथे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ लेखिका प्राध्यापक डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेल्या नोबेल साहित्य दर्शन भाग एक या दिलीपराज प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा आणि पुस्तकावर परिचर्चा असा कार्यक्रम सोमवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे होणार आहे
या ग्रंथाचे लोकार्पण ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत साहित्यिक व समीक्षक डॉक्टर श्रीपाल सबनीस असणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते व लेखक श्रीनिवास शारंगपाणी उपस्थित राहणार असून डॉक्टर निर्मोही फडके यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यवाह आणि
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे
प्रा. डॉ. आश्विनी धोंगडे यांची आत्तापर्यंत ५० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले नोबेल साहित्य दर्शन हे पुस्तक त्यांचे विशेष वाचनीय असे आहे .गेल्या दहा-बारा वर्षात त्यांनी समकालीन नोबेल विजेत्या लेखकांच्या अनेक साहित्यकृती वाचल्या .नोबेल विजेत्या लेखकांच्या साहित्यातील वैश्विकता, सबंध मानव जातीला कवेत घेण्याची क्षमता आणि विचारांची सखोलता अचंबित करणारी आहे हे त्यांना विशेषत्वाने जाणवले.जगातील वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या सांस्कृतिक ,आर्थिक ,वांशिक सामाजिक राजकीय परिस्थितीत वाढलेल्या सर्जनशील मनाचा साहित्यिक अविष्कार कसा होतो हे खूप काही शिकवून जाणारे होते हे वाचताना त्यांच्या लक्षात आले.माणसे समजून घेण्यातला एक उच्च दर्जाचा आनंद त्यांनी अनुभवला .जीवनाकडे पाहण्याचा त्यांच्या दृष्टीत कितीतरी विधायक फरक या वाचनामुळे पडला. या आनंदाची ओळख मराठी वाचकांना करून द्यावी असे त्यांना उत्कटतेने वाटू लागले.त्यातून गेल्या 30 वर्षातल्या दहा नोबेल विजेत्या लेखकांच्या काही साहित्य कृतींचा परिचय त्यांनी या पहिल्या भागातील पुस्तकात करून दिला आहे. पुढच्या भागात आणखी दहा लेखक असतील .

