या मंदिरात राहतात यमराज


मंदिरात आहे चित्रगुप्ताची रहस्यमय खोली

Advertisement

नवी दिल्ली
भारतातील हिमाचल प्रदेशात हजारो मंदिरे आहेत चौरासी मंदिर आपल्या रंजक कथा आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.मंदिराविषयी अशीही एक समजूत आहे की या मंदिरात चार वेगवेगळे अदृश्य धातूचे दरवाजे आहेत. हे चार दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंडाचे बनलेले आहेत.येथे यमराज वास्तव्य करतात आणि त्यांचा दरबार येथे भरतो, ज्यामध्ये यमराज स्वत: ठरवतात की लोक स्वर्गात जातील की नरकात. या मंदिरात प्राचीन काळापासून एक शिवलिंग असल्याचेही मानले जाते आणि मंदिरात एक रहस्यमय खोली देखील आहे, जी चित्रगुप्ताची खोली मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, चित्रगुप्त व्यक्तीच्या कर्मांचा मागोवा ठेवतो.
मान्यतेनुसार, कोणत्याही सजीवाच्या मृत्यूनंतर, त्याचा आत्मा चित्रगुप्तासमोर आणला जातो आणि त्याच्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशेब येथे केला जातो. चित्रगुप्ताच्या रहस्यमय खोलीच्या समोर आणखी एक खोली आहे ज्याला धर्मराजाचा दरबार म्हणतात. या खोलीतच आत्मा आणला जातो आणि येथेच जीवाचा आत्मा पुढे कोठे जाईल याचा निर्णय घेतला जातो, या समजुतीमुळे लोक येथे येण्यास घाबरतात.भाऊबीजेच्या उत्सवानिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी असते. कारण भाऊबीजेचा सण यमराजाशी संबंधित आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!