विवाह म्हणजे इव्हेंट नव्हे,तर संस्कार
अखिल ब्राह्मण महासंघाच्या वधू वर मेळाव्याला प्रतिसाद
सातारा
विवाह हा एक संस्कार आहे,ती एखादी दिखाऊ इव्हेंट नाही त्यामुळे विवाह समारंभाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे प्रतिपादन कुटुंब प्रबोधन संस्थेचे समुपदेशक डॉक्टर श्याम बडवे यांनी केले
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे येथील महिला मंडळ सभागृहामध्ये वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ शाम बडवे बोलत होते
यावेळी व्यासपीठावर अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी उपाध्यक्ष ऍड श्रीराम देव,परांडा येथील ब्रह्मवार्ता वधू वर सूचक मंडळाचे संचालक श्रीराम विद्वत उपस्थित होते
डॉक्टर शाम बडवे यांनी यावेळी वधू वर आणि त्यांचे पालक यांनी विवाह जमवताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले विवाह यशस्वी व्हायचे असतील तर विवाह जुळवतानाच सर्व गोष्टी पाहणे महत्त्वाचे असते यावर त्यांनी भर दिला
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे खजिनदार महेश कुलकर्णी यांनी केले
महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला आणि वधू वर मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली
श्रीराम विद्वत यांनी आपल्या भाषणामध्ये वधू वर सूचक मंडळांचे महत्त्व स्पष्ट करतानाच वधू आणि वर यांच्या पालकांनी केवळ फोनवर संपर्क साधू नये तर प्रत्यक्ष घरी जाऊन बोलणे करणे आवश्यक आहे असे सांगितले

या वधू वर मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला आलेल्या वधू आणि वर यांनी व्यासपीठावर आपल्या पालकांसह येऊन आपली माहिती उपस्थितांना दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक मुकुंद फडके यांनी केले
संचालक शशिकांत पंडित यांनी आभार प्रदर्शन केले
यावेळी अखिल ब्राह्मण महासंघाचे सचिव भास्कर मेहेंदळे संचालिका रेखा बंड संचालक वि ना लांडगे राजवीर माजगावकर श्रीकांत वेलणकर संजय देसाई नितीन जोशी प्रशांत इनामदार आणि महासंघाचे हितचिंतक उपस्थित होते

