अभिनेत्री गौरी देशपांडे यांची मुलाखत
बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी साताऱ्यात आयोजन
सातारा
आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी संस्था यांच्या विद्यमाने प्रसिद्ध अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी नागरी सहकारी संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे डॉ संदीप श्रोत्री आणि आदिश पायगुडे हे गौरी देशपांडे यांची मुलाखत घेणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सारिका देशपांडे करणार आहेत यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचा सत्कार गौरी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
गौरी देशपांडे या श्यामची आई या चित्रपटातील श्यामच्या आईच्या भूमिकेमुळे लोकप्रिय आहेत या कार्यक्रमाचा लाभ सर्व सातारकरांनी घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस डॉ. संदीप श्रोत्री आणि श्रीराम नानल यांनी केले आहे
