‘सलमान खान यह तो ट्रेलर है…’;
अनमोल बिश्नोईने घेतली गोळीबाराची जबाबदारी,
मुंबई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे या नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला.आता या बिश्नोई गँगमधील एका सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली असून त्याने फेसबुकवर याबाबत पोस्ट व्हायरल केलीय.सध्या त्याच्या फेसबुक अकाऊंटचे व्हेरिफिकेशन मुंबई पोलिस करत आहेत.व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगमधील सदस्याने लिहिले की, “सलमान खान आम्ही तुला फक्त हे ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे. कारण तु आमच्या ताकदीला समजायला हवे. ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. यानंतर बंदुकाच्या गोळ्या खाली घरावर नाही चालणार, तर भरलेल्या घरावर चालतील. बाकी मला जास्त बोलायला नाही आवडत…” आणि पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचं नाव लिहिलं आहे. त्यासोबतच ग्रुपमधील काही सदस्यांचेही नावं लिहिलेली आहे.
या गोळीबारामध्ये, कोणीही जखमी झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते
