महिलांना श्रीमंत करणारी योजना
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना
मुंबई
भारत सरकारने खास महिलांसाठी एक गुंतवणूक योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला अवध्या दोन वर्षांत श्रीमंत होऊ शकतात.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत 7.5 टक्के व्याज मिळते
सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं खोलावं लागतं. त्यानंतर या खात्याच्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत सरकार ठेवलेल्या ठेवीवर तब्बल 7.5 टक्के व्याज देते. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महिला आपल्या सोईनुसार गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकतात.ही एक स्मॉल सेव्हिंग स्किम असून त्यात फक्त दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत महिला खातेधारक जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. 2023 साली ही योजना चालू करण्यात आली होती. मिळणाऱ्या भरघोस परताव्यामुळे अगदी कमी काळात ही योजना प्रसिद्ध झाली आहे. योजनेचे आणखी एक वैशिष्य म्हणजे त्यात 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावेदेखील गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत पैसे गुंतवण्यासाठी खाते खोलायचे असल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, एक चेक अशी कागदपत्रे लागतात.
