संस्कृती दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे :
स्त्री चळवळीचे अर्धशतक हा वेगळा आणि महत्वाचा विषय घेवून संस्कृतीचा अठरावा दिवाळी अंक बाजारात आला असून जेष्ठ साहित्यिक मा.विश्वास वसेकर,सा.फु.पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मा.संदिप सांगळे,मसापचे कार्यवाह मा.शिरीष चिटणीस, संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकाचे प्रकाशन संपन्न झाले
बरोबर पन्नास वर्षापूर्वी सिमन द बो-या द सेकंड सेक्स’ चा मराठीत अनुवाद आला. मराठी स्त्रीवादाची इथूनच सुरुवात झाली. त्याचा सुवर्णमहोत्सव संस्कृतीच्या यंदाच्या दिवाळी अंकाने विशेषांक काढून साजरा केला आहे. संपादकांच्या कल्पकतेचे कौतुक केले पाहिजे असे उद्गार ज्येष्ठ समीक्षक प्रा.विश्वास वसेकर यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस होते.
अध्यक्ष पदावरून बोलताना शिरीष चिटणीसांनी प्रत्येक अंक एक विषय घेऊन करण्याच्या परंपरेचा गौरव केला. यापूर्वीच्या काही अंकांना संस्कृती प्रकाशनाने पुस्तकरूप दिल्याचे सांगून याही अंकाचे पुस्तक करावे अशी सूचना केली.
संस्कृती दिवाळी अंकाच्या संपादिका आणि अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी अंकातील लेखांचा थोडक्यात परिचय करून दिला. या प्रसंगी दिनेश फडतरे, संजय ऐलवाड, मंजिरी बेंद्रे, राहुल कुंभार, मिनाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते

