सरबजीतच्या मारेकऱ्याचा गेम


पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून केली हत्या

Advertisement

इस्लामाबाद
हेरगिरीच्या नावाखाली कित्येकवर्षे भारतीय नागरीक सरबजीत सिंग यांचा आतोनात छळ करण्यात आला होता आणि त्यानंतर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय च्या इशाऱ्यावरुन लाहोर तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली होती.आता त्यांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमिर सरफराज असे या गुंडाचे नाव आहे. तो पण लाहोर तुरुंगात होता. सरबजीत सिंग यांना 1990 साली पाकिस्तानने हेरगिरीच्या नावाखाली अटक केली होती.
त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. 1990 पासून ते पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात होते. त्यांच्या सुटकेसाठी मोठी आंदोलने झाली. भारत सरकारने त्यांच्यावरील आरोप फेटाळत, त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानकडे शिष्टाई केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 2013 मध्ये पाकिस्तानच्या लाहोर तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरुनच नामचीन गुंड अमीर सरफराजने ही हत्या केल्याचा आरोप होता.
गेल्या दोन वर्षांपासून भारत विरोधकांची पाकिस्तानमध्ये खून होत आहे. यामध्ये आयएसआयच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अनेकांना रस्त्यावर, दुकानावर, अज्ञातांकडून टिपण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत दहशतवादी आणि भारताविरोधात गरळ ओकणाऱ्यांना आता पळता भूई थोडी झाली आहे. पाकिस्तानमधील नेत्यांनी या प्रकाराला कॉन्ट्रॅक्ट किलिंग, टार्गेट किलिंग असे नाव देऊन त्याचे खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
अलजझीरा या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानुसार, गेल्या वर्षभरात 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये 6 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मुहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित, पाकिस्तान आर्मीशी संबंधित, पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेतील सदस्य यांना यमसदनाला पाठविण्यात आले आहे. या सगळ्यांनी भारताविरोधात कारवाया केलेल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!