साताऱ्यात सोमवारी गुजर हुआ जमाना कार्यक्रम


लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त मैफल
सातारा
गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्मदिन २८ सप्टेंबर रोजी आहे त्याचे औचित्य साधून कलासरगम सातारा आणि आणि आम्ही आनंदयात्री यांच्यातर्फे गुजर हुआ जमाना हि गाण्यांची विशेष मैफिल सादर केली जाणार आहे लता मंगेशकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या कर्णमधुर गाण्यांचा अनमोल खजिना या कार्यक्रमात सादर केला जाणार आहे हा कार्यक्रम सोमवार २८ सप्टेंबरला न्यु ईंग्लिश स्कुल सातारा येथे संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत संपन्न होणार आहे.. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की हा कार्यक्रम लाईव्ह ऑर्केस्ट्रा वर होणार असुन अत्यंत नावाजलेले वाद्यवृंद गायकांची साथसंगत करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य आहे कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन मुकुंद पांडे यांची असून स्नेहल कुलकर्णी निवेदन करणार आहेत.सचिन शेवडे अक्षता शेवडे ध्वनी व्यवस्था सांभाळणार आहेत.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतुल चाफेकर,अमेय आगटे,सुधाकर कुलकर्णी आणि अशोक वाळिंबे उपस्थित राहणार आहेत सर्व सातारकर रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!