साताऱ्यात सोमवारी हिंदी व मराठी गीतांची सुश्राव्य मैफिल


दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रंगोली ग्रुपतर्फे आयोजन

Advertisement

सातारा: दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि रंगोली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता एक शानदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार पेठ येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे ‘हिंदी व मराठी गीतांची सुश्राव्य मैफिल’ रंगणार आहे या संगीतमय मैफिलीमध्ये साताऱ्यातील कलाकार गायक सुरेश सर, हेमंत सर, चेतन सर तसेच गायिका दुर्गा मॅडम, शुभांगी मॅडम आणि साक्षी मॅडम आपल्या सुमधुर आवाजात लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी सादर करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना ‘रंगोली ग्रुप’ची असून, कार्यक्रमाचे निवेदन ‘रंगोली टीम’ करणार आहे. तसेच कार्यक्रमाला ध्वनी संयोजनाची जबाबदारी श्री. लोंढे सर सांभाळणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, नंदा पवार, उज्वला कर्नवर, शितल मोरे, नयना जाधव आणि रोहिणी स्वामी उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणार असून, साताऱ्यातील नागरिकांनी आणि संगीत रसिकांनी या सुश्राव्य मैफिलीला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रंगोली ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!