अंतराळात होणार प्रचंड स्फोट


80 वर्षात एकदाच घडते अशी घटना

वॉशिंग्टन

Advertisement

काही खगोलीय घटना इतक्या दुर्मिळ असतात, की आयुष्यात एकदाच अनुभवता येतात अंतराळातली अशीच एक घटना आपल्याला पहायला मिळणार आहे. अवकाशात होणारा एक प्रचंड मोठा स्फोट जो नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल. 80 वर्षांतून एकदाच होणारी ही घटना म्हणजेच ताऱ्याचा स्फोट.
ही दुर्मिळ खगोलीय घटना सप्टेंबर 2024पूर्वी घडेल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. आणि हा स्फोट जेव्हा होईल तेव्हा तो पाहण्यासाठी महागड्या टेलिस्कोपची गरज नाही, तर तो नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल. हा स्फोट दर 80 वर्षांनी एकदा होतो. यापूर्वी 1946 मध्ये असा स्फोट झाला होता.
नासाच्या मिटिओराईड इन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचे मॅनेजर विल्यम कूक सांगतात, “हे म्हणजे 75-80 वर्षांनी दिसणाऱ्या हॅलेच्या धूमकेतूसारखं आहे. पण हॅलेच्या धूमकेतूला जशी माध्यमांत प्रसिद्धी मिळते तशी या नोव्हा स्फोटांना मिळत नाही.
नोव्हा स्फोट नेमका कधी होईल याची बहुतेकदा संशोधकांना कल्पना नसते. पण असे साधारण 10 नोव्हा आहेत जिथे ठराविक कालावधीने स्फोट होत असल्याचं विल्यम कुक सांगतात.
याआधीच्या स्फोटांचे पुरावे आणि काही आकडेमोडीनंतर हे वर्तवण्यात आलंय. याआधी 78 वर्षांपूर्वी 1946 मध्ये पहायला मिळाला होता. त्यानुसार आता पुन्हा हा स्फोट होण्याची वेळ आलेली आहे. पण या नोव्हाचे इतरही काही संकेत संशोधकांनी टिपले आहेत.
ज्यांना हा नोव्हा पहायचा आहे त्यांनी आकाशामध्ये कोरोनो बोरिआलिस तारकासमूहाजवळ पहावे. बॉटिज म्हणजेच भूतप आणि हॅक्युलस म्हणजे शौरी नक्षत्राच्या जवळच्या लहान कमानीजवळ हा नोव्हा दिसेल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!