स्वर्गात जागा देण्याचे आमिष
डॉक्टरची ६ कोटीची फसवणूक
पुणे
स्वर्गात जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका नामांकित डॉक्टरची तब्बल सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.पीडित डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारे हे ६७ वर्षीय डॉक्टर अनेक वर्ष विदेशामध्ये होते. भारतात परत आल्यानंतर त्यांनी आरोपींना आपली कौटुंबिक अडचण सांगितली. डॉक्टरांच्या अडचणीचा फायदा घेत आरोपींनी त्यांची तब्बल ६ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली आरोपींनी पृथ्वीवरून थेट स्वर्गात जागा मिळवायचे असेल तर मी सांगेल तसे तुम्ही करा, असे म्हणत वेळोवेळी भूलथापा देत डॉक्टरांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अब्दुल मजीद शेख, यास्मिन शेख,इतैए श्याम शेख, अम्मा सादीक शेख आणि राजू आढाव अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत..
