युट्युबर कपलची आत्महत्या


अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरुन मारली उडी

Advertisement

डेहराडून :
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका यूट्यूबर कपलने आपल्या भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली.हरियाणाच्या बहादुरगड येथे ते राहात होते. गर्वित आणि नंदिनी हे कपल हरियाणातील बहादूरगड येथे त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी आणि शॉर्टफिल्म बनवण्यासाठी आलं होतं.त्यांच्यासोबत डेहराडूनहून सुमारे पाच जणांची टीम बहादूरगडला आली होती. हे सगळे लोह रुहिल रेसिडेन्सीच्या सातव्या मजल्यावर एका खोलीत भाड्याने राहत होते. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची ओळख 25 वर्षीय गर्वित आणि 22 वर्षीय नंदिनी अशी समोर आली आहे. दोघेही मिळून चॅनल चालवायचे आणि शॉर्ट फिल्म्स बनवायचे. असं सांगितलं जात आहे, की याआधी दोघेही त्यांच्या टीमसोबत डेहराडूनमध्ये राहत होते पण काही दिवसांपूर्वी ते बहादूरगडमध्ये शिफ्ट झाले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही हरियाणातील बहादूरगड येथील रुहेला रेसिडेन्सीमध्ये सातव्या मजल्यावर भाड्याने घर घेऊन पाच लोकांसह राहत होते. शूटिंग संपवून दोघेही परतले होते आणि त्यांच्यात काही मुद्द्यावरून वाद झाल्याचं समोर येत आहे. वाद इतका वाढला, की दोघांनी सातव्या मजल्याहून उडी घेत आत्मतहत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस सध्या आत्महत्येचं कारण शोधत आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!