वार्षिक राशिभविष्य २०२४ धनु रास
वार्षिक राशिभविष्य २०२४
धनु रास

मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील
न्यूज मंडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धनु राशीचे लोक खूप जास्त प्रामाणिक आणि समजूतदार असतात. या राशीमध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात. यांना वैचारिक स्वातंत्र्य असते.हे लोक बुद्धीमान लोकांकडे लवकर आकर्षित होतात. ते मनाने स्वच्छ असतात आणि विश्वासू असतात. त्यांचे कोणतेही काम ते खूप मेहनतीने पूर्ण करतात.या लोकांचा स्वभाव हसरा आणि दिलखुलास असतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि हटके असते त्यामुळे अनेकजण त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते खूप जास्त महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी असतात त्यामुळे अनेकजण त्यांना आपला आदर्श मानतात.धनु राशीचे लोक मनाने स्वच्छ असले तरी थोडे रागीट असतात. ते छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद घालतात. अनेकदा ते राग मनात ठेवतात त्यामुळे त्यांना याचा सर्वात जास्त त्रास होतो.या राशीच्या लोकांना समजून घेणे खूप कठीण असते. त्यामुळे लोकांना यांच्याविषयी अनेकदा गैरसमज होतात. हे लोक आपल्याच दुनियेत मग्न आणि आनंदी असतात पण त्यांना इतरांना आनंदी ठेवायला आवडते.
नवीन वर्ष हे नोकरी व्यवसायासाठी अत्यंत लाभदायक ठरेल काहीजण नवीन वास्तूमध्ये प्रवेश करतील काहींना विवाह योग येतील नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तर व्यावसायिकांना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील ग्रहणाजवळ आरोग्याची काळजी घ्यावी लागेल एकूणच नवीन वर्ष हे तरुणांसाठी भाग्यकारक ठरेल. एप्रिल 2024 पर्यंत राशी स्वामी गुरु हा पंचम स्थानातून भ्रमण करेल तर शनी तृतीय स्थानातून भ्रमण करेल. ज्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींना चांगले यश मिळेल छायाग्रह राहू आणि केतू हे चतुर्थ आणि दशम स्थानातून भ्रमण करतील जे फारसे अनुकूल असणार नाहीत मे 2024 नंतर गुरुचे भ्रमण सहाव्या स्थानातून होईल जे फारसे अनुकूल राहणार नाही या काळात खर्च वाढतील आणि आराम मिळणे शक्य होणार नाही आरोग्य फारसे चांगले राहणार नाही परंतु शनीमुळे मात्र करिअरमध्ये चांगली प्रगती होईल मे 2024 पर्यंत चांगले आर्थिक लाभ होतील तुम्ही चांगली बचतही करू शकता अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा जास्त राहील मे 2024 नंतर आर्थिक अडचणी येऊ शकतात कौटुंबिक अडचणींमुळे कदाचित कर्जही काढावे लागू शकते व्यावसायिकांनी कोणताही मोठा निर्णय मे 2024 पूर्वी घ्यावा 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या काळात शनी वक्री राहील ज्यामुळे करिअरमध्ये तसेच आर्थिक अडचणी येऊ शकतात
एप्रिल 2024 पर्यंत करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल चांगली नोकरी मिळू शकेल स्वतःच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण कराल.
मे 2024 नंतर आर्थिक बाबतीत अनेक अडचणी जाणवू शकतील त्यामुळे मे 2024 पूर्वी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करून ठेवू शकता तिसऱ्या स्थानातील शनी तुम्हाला धनसंचय करायला मदत करेल चौथा राहू आणि दशम स्थानातील केतूमुळे कुटुंबात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात कदाचित तुम्हाला निवासस्थान सोडून दुसऱ्या जागी राहायला जावे लागू शकते. त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल नोकरीतही परिवर्तन होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो
विद्यार्थ्यांना एप्रिल 2024 पर्यंतचा काळ अतिशय चांगला जाईल अपेक्षित प्रगती आणि यश मिळेल मे 2024 नंतर मात्र प्रगतीचा आलेख कमी होईल चतुर्थातील राहू मुळे अभ्यासात लक्ष लागणार नाही एकाग्रता कमी होईल
एप्रिल 2024 पर्यंत कुटुंबात आनंददायी वातावरण असेल परंतु चतुर्थातील राहूमुळे कुटुंबात संपत्ती वरून काही ताणतणावाचे मुद्दे यामुळे कलह निर्माण होऊ शकतो
मे 2024 पर्यंतचा काळ प्रेम आणि विवाह साठी अत्यंत अनुकूल आहे मे 2024 नंतर विवाहाचे योग येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी एप्रिल 2024 पर्यंत विवाह करावा
एप्रिल 2024 पर्यंत तुमचे आरोग्य चांगले राहील त्यानंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी वाढतील कामानिमित्त तुम्हाला अनेक प्रवास करावे लागतील त्याचाही परिणाम आरोग्यावर होऊ शकतो पाय दुखी गुडघेदुखी इत्यादी तक्रारी जाणवू शकतात
