वार्षिक राशिभविष्य २०२४ सिंह रास


वार्षिक राशिभविष्य २०२४ सिंह रास

 

जास्त मेहनत करावी लागेल

न्यूजमंडीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांमध्ये लहानपणापासूनच नेतृत्व क्षमता असते. हे लोक खूप धैर्यवान आणि साहसी असतात. सिंह राशीच्या लोकांना राजासारखे आयुष्य जगावे, असे वाटते. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असते. त्यांना नेहमी स्पष्ट बोलायला आवडते आणि ते नेहमी आपल्या निर्णयावर ठाम असतात.या राशीचे लोक खूप चांगले मित्र असतात. तसेच ते नेहमी महत्त्वाकांक्षी, साहसी व सकारात्मक असतात. या राशीच्या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. त्यामुळे कोणतेही काम ते खूप मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीचे लोक हसमुख स्वभावाचे असतात. ते जरी दिसायला साधे सरळ दिसत असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावशाली असते. त्यामुळेच अनेकांना ते प्रिय असतात.असे म्हणतात की, सिंह राशीचे लोक खूप रागीट स्वभावाचे असतात आणि रागाच्या आवेशात ते अनेकदा स्वत:चे नुकसान करून घेतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून ते लवकर नाराजही होतात.

Advertisement

या वर्षात अनेक तरुणांना नोकरी मिळू शकते स्वतंत्र व्यावसायिकांनाही वर्ष उत्तम जाईल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल येणाऱ्या ग्रहणाच्या दरम्यान काहींना  शत्रु पिडा अडचणी तर काहींना नुकसान होण्याची शक्यता आहे यावर्षी अनेक जण वैवाहिक जीवनात पदार्पण करतील ग्रहणाजवळ आरोग्याची काळजी घेणे ही महत्त्वाचे ठरेल  एप्रिल 2024 पर्यंत गुरुचे भ्रमण भाग्यस्थानातून होणार आहे त्यामुळे करिअर साठी तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो एप्रिल 2024 पूर्वी घ्यावा 1  मे 2024 ला गुरु दशम स्थानात गोचर करणार आहेत या दरम्यान काही जणांना अचानक नोकरीत बदल करावा लागेल किंवा नोकरी   सोडावी लागेल राहू अष्टमात आणि केतू द्वितीयात भ्रमण करणार असल्यामुळे करिअरच्या चांगल्या संधी सोडाव्या लागतील त्यामुळे धनहानी आणि अनेक अडचणी येऊ शकतात  शनीचे सप्तमातील भ्रमण तुमच्या प्रत्येक कार्यात विलंब होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक कामात जास्त मेहनत करावी लागेल एक मे 2024 नंतर दशमस्थानात येणारा गुरु यामुळेही कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात खर्चात वाढ होईल त्यामुळे आर्थिक अडचणीचा  सामना करावा लागेल राहू केतूमुळे धनहानी आणि नात्यात कडवटपणा जाणवू शकतो

सप्तमातील शनी मुळे नोकरदारांना तसेच व्यावसायिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागेल नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना हे वर्ष चांगले जाणार नाही तसेच भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करतानाही अतिशय विचारपूर्वक  निर्णय घ्यावा लागेल

एप्रिल 2024 पर्यंत आर्थिक बाबतीत काळ चांगला असेल परंतु सप्तमातील शनी मुळे कुटुंबासाठी खर्च वाढू शकतात जोडीदाराच्या आरोग्यासाठीही जास्त खर्च करावा लागेल 13 एप्रिल ते 14 मे 2024 तसेच 12 जून ते 24 ऑगस्ट 2024 हा काळ तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत चांगला राहील

विद्यार्थ्यांना हे वर्ष यशदायक जाईन परंतु त्यासाठी अभ्यास अतिशय एकाग्रतेने आणि सकारात्मक पद्धतीने करावा लागेल

कुटुंबात यावर्षी आनंदाचे आणि सद्भावाचे वातावरण राहील परंतु मे 2024 नंतर कौटुंबिक स्वास्थ्य कमी होऊ शकते कुटुंबात संपत्ती संबंधी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल त्यामुळे कुटुंबात वाद-विवाद होण्याची ही शक्यता आहे

हे वर्ष सिंह राशीच्या जातकांना प्रेम विवाह आणि विवाह यासाठी अनुकूल आहे

हे वर्ष आरोग्याच्या बाबतीत ठीक जाईल  डोळ्यांशी संबंधित काही समस्या येऊ शकतात मात्र  जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!