द्रौपदाबाई प्रल्हादराव चव्हाण यांचे निधन
सातारा,
वेळे – कामथी (ता. सातारा) येथील ज्येष्ठ नागरिक द्रौपदाबाई प्रल्हादराव चव्हाण (वय ७७) यांचे आज दुपारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
दिवंगत ज्येष्ठ नेते प्रल्हादभाऊ चव्हाण यांच्या त्या पत्नी आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सातारा तालुका काँग्रसचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.
ज्येष्ठ नेते प्रल्हाद भाऊ यांच्या निधनाला वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांच्या पत्नीचे पाठोपाठ निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

