विशाल पाटील यांची माघार नाही
सांगलीत मविआला धक्का, आता तिरंगी लढत
सांगली :
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा शेवटी सुटलाच नाही. काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला.त्यामुळे सांगली लोकसभेसाठी आता तिरंगी लढत निश्चित आहे
विशाल पाटील यांची बंडखोरी हा काँग्रेसला आणि मविआला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते मात्र काँग्रेस नेत्यांना यात अपयश आले.काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली
महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात आता हि लढत होईल
