परशुराम सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी संकेत पुराणिक
सातारा
परशुराम सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सातारा येथील संकेत पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे परशुराम सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित देशपांडे आणि प्रदेश कार्याध्यक्ष उपेंद्र जपे यांनी ही नियुक्ती केली असून नियुक्तीचे पत्र विश्वजित देशपांडे यांनी पुराणिक यांना प्रदान केले या नियुक्तीबद्दल परशुराम सेवा संघाचे राज्य अध्यक्ष विश्वजित देशपांडे,कार्याध्यक्ष उपेंद्र जपे ,उपाध्यक्ष महेश अष्टेकर,मंदा अष्टेकर,ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके,हेमंत कापरे ,राहुल कुलकर्णी ,दत्तात्रय टोळ, प्रसाद झिम्प्रे,प्रकाश कुलकर्णी करंडीकर,मुकुंद लांडगे,अभिजित इनामदार आणि समाज बांधवांनी संकेत पुराणिक यांचे अभिनंदन केले परशुराम सेवा संघाची सातारा कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे यावेळी पुराणिक यांनी सांगितले
