वर्तमान जगा आनंदाने


न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
मनुष्य स्वार्थी नाही,त्याला दानधर्म करणे आवडते
सात देशातील 200 लोकांवर झालेल्या संशोधनातील निष्कर्ष

 

वॉशिंग्टन
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या जीवसृष्टीतील मनुष्य हा प्राणी सर्वात हुशार मानला जातो पण त्याच्यावर स्वार्थी हा शिक्काही बसला आहे मनुष्य हा खूपच स्वार्थी प्राणी असल्याचा निष्कर्ष यापूर्वी अनेक वेळा सामाजिक शास्त्रज्ञांनीही काढला आहे पण आता एका ताज्या संशोधनाप्रमाणे माणूस स्वार्थी नसून त्याला दानधर्म करणे आवडते आणि त्यातून त्याला वेगळा आनंद प्राप्त होतो

जगातील 7 देशातील 200 नागरिकांचे सखोल संशोधन केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे या 200 लोकांना आठ लाख रुपये देण्यात आले होते आणि या रुपयांचा खर्च ते कशाप्रकारे करतात हे पाहण्यात येत होते या नोंदी लक्षात घेऊनच हे निष्कर्ष काढण्यात आले असून माणूस स्वार्थी नसून त्याला दानधर्म करणे आवडते असे संशोधकांचे मत झाले आहे प्रख्यात मनोवैज्ञानिक रायन झेडवेअर, विल्यम ब्रॅडी एलिझाबेथ डब्ल्यू या तिघांनी संयुक्तपणे संशोधन केले असून त्याबाबतचा लेख एका नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे

ज्या लोकांना आठ लाख रुपये देण्यात आले होते त्यांना काही कालावधीनंतर त्या पैशाचा हिशोब मागण्यात आला तेव्हा बहुतेक सर्व लोकांनी या आठ लाख रुपयांपैकी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दुसऱ्यांवर खर्च केली होती एक लाख 40 हजार रुपयांचा दानधर्म करण्यात आला होता दुसऱ्या लोकांच्या आनंदासाठी केलेल्या खर्चामुळे मनुष्याला आनंद प्राप्त होतो असा निष्कर्ष या निमित्ताने संशोधकांनी काढला आहे तसेच दानधर्म केल्यामुळे सुद्धा मनुष्याला वेगळे समाधान मिळते असेही संशोधकांनी म्हटले आहे दानधर्मा व्यतिरिक्त या व्यक्तीने जो खर्च केला त्यापैकी मोठा खर्च हा अनोळखी व्यक्तींवर सुद्धा करण्यात आला होता तर जवळचे व्यक्ती किंवा नातेवाईकांवर थोडा कमीच खर्च करण्यात आला होता, ही बाब सुद्धा संशोधकांच्या लक्षात आली

 

न्यूजमंडी/ज्ञानकोश

 


काळजीवाहू पंतप्रधान

जर महात्मा गांधींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आणि मार्गावर तंतोतंत चालणारा म्हणजे गांधीवादी अशी व्याख्या कुणी केली तर कदाचित गुलझारीलाल नंदा यांच्यापेक्षा दुसरी गांधीवादी व्यक्ती राजकारणात सापडणं कठीण आहे.कार्यालयातला कागद सुद्धा कधी आपल्या वैयक्तिक कामासाठी वापरला जाणार नाही याची खबरदारी घेणारा आणि दोनदा देशाचा काळजीवाहू पंतप्रधान राहिलेला हा नेता निवृत्तीनंतर भाड्याच्या घरात राहत होता.ही गोष्ट आज तुम्हाला खरी वाटणार नाही ना? हो पण हे अगदी खरं आहे जेव्हा गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं सर्व सामान एका पिशवीत मावेल एवढं होतं, असं त्यांच्याच मुलीने सांगितलं होतं.27 मे 1964 रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर 9 जूनपर्यंत नंदा यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी वाहिली. त्यानंतर लालबहादुर शास्त्री देशाचे पंतप्रधान राहिले.11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूरशास्त्री यांचं ताश्कंदमध्ये निधन झालं आणि त्याच दिवशी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी पडली. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. गुलझारीलाल नंदा यांचा आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढावी या उद्देशाने त्या त्यांच्या निवासस्थान येणार होत्या.पंतप्रधान कार्यालयाकडून नंदा यांना फोन आला की तुमच्या वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन करण्यासाठी पंतप्रधान तुमच्या निवासस्थान येणार आहेत. तेव्हा नंदा यांनी स्पष्टपणे सांगितले की याची काहीच गरज नाही. तुम्ही त्यांना सांगा की येऊ नका. पण तोपर्यंत इंदिरा गांधींनी आपलं मन बनवलं होतं. इंदिरा गांधी त्यांच्या घरी आल्या. त्यांच्यात 25 मिनिटं चर्चा झाली.नंदा यांनी आपला आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना सांगितलं. स्वातंत्र्यासाठीच आपण हे केलेलं असताना लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं अयोग्य असल्याचं ते इंदिरा गांधींना म्हणाले.11 एप्रिल 1977 रोजी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी सांगितले होते की सध्याची काँग्रेसमधील परिस्थिती ही असह्य झाली आहे.

Advertisement

.

 

न्यूजमंडी/सुविचार
१. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

२. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

३. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

 

 

न्यूजमंडी/विनोद

गरज
20 – 25 तत्ववेत्ते हिमालयात जात होते…
एक न्यूज रिपोर्टर – तुम्ही सर्व लोक कुठे चालला आहात…?
तत्ववेत्ते – हिमालयात, समाधी घ्यायला…
न्यूज रिपोर्टर – पण का…?
असं काय घडलंय…!
तत्ववेत्ते – जेव्हापासून Whatsapp आलंय,
तेव्हापासून मोठ-मोठे ज्ञानी, तत्ववेत्ते पैदा होऊन राहिलेत,
आता संसाराला आमची काही गरज नाहीये…!

फेल
डॉक्टर (संताला) – सांगण्यास वाईट वाटतंय कि,
तुमची एक किडनी फेल झाली आहे…!
हे ऐकल्यावर संता खूप रडतो…
मग तो शांत होऊन डॉक्टरला विचारतो…
किती गुणांनी…?

फरशी
संता पोलिसात भरती होतो…
एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो…
संता – साहेब, इथं एका महिलेने आपल्या
पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय…!
पोलीस इन्स्पेक्टर – का…?
संता – तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून…
पोलीस इन्स्पेक्टर – मग त्या महिलेला अटक केली का नाही…?
संता – नाही …अजून फरशी थोडीशी ओली आहे

 

 

न्यूजमंडी/खाद्ययात्रा

शेंगदाण्याची पोळी
साहित्य
1/2 मेजरींग कप शेंगदाणे 1/3 मेजरींग कप गुळ (जास्त गोड आवडत असल्यास १/२ कप) 1/2 टिस्पून जायफळ वेलची पूड 2 टेबलस्पून साजूक तूप 1 कप कणीक मीठ चवीपुरते
कृती
प्रथम कणकेमध्ये मीठ मिक्स करून गरजेनुसार पाणी घालून घट्टसर डो बनवा . थोडे तेल घालून चांगला मळून घ्या व झाकून ठेवा आता सारण तयार करण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्या ते थंड झाल्यावर साल काढून त्याचे कुट करून घ्या .आता कुट व किसलेला गुळ दोन्ही मिक्सरवर फाईन पेस्ट करून घ्या त्यात साजूक तूप व वेलची जायफळ पावडर दोन्ही मिक्स करून. गोळा मळून १५ मिनिट झाकून ठेवा .कणकेच्या लहान गोळ्याची पारी करून त्यात शेंगदाण्याच्या मिश्रणाचा गोळा स्टफ घालून व लाटून पोळी बनवून घ्या आता फ्राय पॅनवर साजूक तूप घालून शेंगदाण्याची पोळी दोन्ही बाजूने त्यावर शेकून घेणे या पोळ्या छान खमंग व टेस्टी लागतात


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!