दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशी
राजकारणात असून घर-जमीनही नावावर नाही
नवी दिल्ली
आपच्या नेत्या आतिशी सिंह दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड झााली असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आतिशी यांचे नाव सुचवले आबे.
आतिशी या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. शिवाय अत्यंत बुद्धीमान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरल्या आहेत .
आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तर आतिशी यांचे वडील विजय कुमार सिंब आणि आई तृप्ती वाही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले आहे. आतिशींचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना सिंग आहे. मार्क्स आणि लेनिन या नावाचा आधार घेऊन मार्लेना नाव निवडले आहे. मार्लेना नावापेक्षा कामावर चर्चा व्हावी म्हणून 2018 साली त्यांनी आतिशी नाव धारण केले आहे.2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार आहे.

