छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी


१३ तास कष्ट ,१६ पोती रांगोळी,२ हजार चाैरस फुट जागा

Advertisement

सातारा :
फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील रांगोळी कलाकार आकाश दळवी याने राजवाडा चाैपाटी येथे १३ तासात १६ पोती रांगोळींचा वापर करून तब्बल ६० बाय ३६ फुट अर्थात २ हजार चाैरस फुट क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली.
ही रांगोळी सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.
साताऱ्यातील आकाश दळवी या रांगोळी कलाकाराने रविवारी रात्री ९ वाजता रांगोळी रेखाटायला सुरूवात केली. यासाठी त्याला बबन लोहार आणि साइ थोरात या दोन कलाकारांचीही मदत झाली. रात्री ९ वाजता सुरू झालेले हे रेखाटन तब्बल १३ तास चालले सकाळी ११ वाजता ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. गौंधी मैदानाच्या सोमण व्यासपीठासमोर काढलेली ही महाकाय रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!