मर्चंट नेव्हीमध्ये बंपर भरती
दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
नवी दिल्ली
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मेगा भरतीला सुरूवात झाली आहे ही भरती प्रक्रिया भारतीय मर्चंट नेव्हीकडून राबवली जात आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीआहे .
या भरती प्रक्रियेतून तब्बल 4000 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी sealanemaritime.in. या साईटला जा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलीच सविस्तर माहिती ही मिळेल. केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी उमेदवारांकडे आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास, आयटीआय आणि बारावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची माहिती https://sealanemaritime.in/pdf/sma_advertisement_smmar24.pdf येथे वाचायला मिळेल.
