माझ्या नवऱ्याची बायको


प्रसिद्ध गायिकेने मुलगी शोधून नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं

कुआलालंपुर
जगात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. एखादीच अशी महिला असू शकते की जी नवऱ्याचं दुसरं लावून देईल. मलेशियातील एका प्रसिद्ध गायिकेने थेट नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं.विशेष म्हणजे तिनेच नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधली आणि दोघांचा संसार थाटून दिला. हे करताना तिने दिलेलं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
एजलाइन अरिफिन असं या गायिकेचं नाव आहे. ती 42 वर्षाची आहे. एजलिन या नावाने ती लोकप्रिय आहे. 2003मध्ये आवांटा-गार्डे हाय हाय बाय बाय… या गाण्यामुळे ती देशात लोकप्रिय ठरली होती. तिचे इन्स्टाग्रामवर 173,000 फॉलोअर्स आहेत. गेल्या दोन वर्षापासून तिचं कोणतंही नवं गाणं आलं नाही. तरीही ती सुके शॉप सारख्या मलेशियन टेलिव्हिजन शॉपिंग चॅनलवर सक्रिय आहे. एजलिन सध्या तिच्या चाहत्यांना फूड प्रोडक्ट्स विकते.
एजलिनने तिच्या आयुष्यातील एक मोठा धाडसी निर्णय घेतला. तिने पती वान मोहम्मद हफीजम यांचा गेल्या वर्षी 26 वर्षीय तरुणीशी दुसरा विवाह लावून दिला. मोठ्या थाटात तिने नवऱ्याचं लग्न लावून दिलं. नवऱ्याचं लग्न लावून देण्याची माझीच आयडिया होती, असं तिने म्हटलंय. दुसरी पत्नी नवऱ्यासोबत राहील. त्याची काळजी घेईल. त्यामुळे मी माझ्या करिअरवर फोकस ठेवेल. माझ्या करिअरला पुढे नेईन, त्यासाठीच मी हा निर्णय घेतल्याचं एजलिन म्हणाली.

Advertisement

मी एक व्यस्त व्यक्ती आहे. मला कामानिमित्ताने दूरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे मी नेहमी त्रस्त होते. मला घरातील कामासाठी कुणाच्या तरी मदतीची गरज होती, असं तिने म्हटलंय. नवऱ्यासाठी योग्य वधू शोधण्यासाठी तिने अनेक मॅचमेकिंग कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर अखेर तिच्या नवऱ्याला योग्य वधू मिळाली. आम्ही दोघीही नवऱ्यासोबत आठवडा आठवडा भर राहतो, असं एजलिनने म्हटलंय. आम्ही स्त्रीया आहोत, त्यामुळे एकमेकींचा हेवा वाटतो. पण जर माझ्यासाठी नवरा त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो आणि योग्य देखभाल घेऊ शकतो तर महिलांनाही त्या शेअर करण्यात काही अडचण नसली पाहिजे, असं सांगतानाच बहुविवाह सर्वांसाठीच योग्य नाही, असं तिने स्पष्ट केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!