28 वर्षीय तरुणीला हवाय इच्छामृत्यू


मेमध्ये घरात सोफ्यावर इच्छा मृत्यू दिला जाणार

लंडन

Advertisement

मृत्यू अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येक जण मरणार आहे.एखादी व्यक्ती 100 वर्षापेक्षा अधिक जगते, तर काहीजण 20-30 वयातच हे जग सोडून निघून जातात.एस्वत:च्या हाताने स्वत:च जीवन संपवून घेण्याबद्दल आतापर्यंत बरच ऐकलं असेल.आता एका महिलेने वयाच्या 28 व्या वर्षी सरकारकडे इच्छामृत्यूची मागणी केल्याची बातमी चर्चेत आली आहे
जोराया टेर बीक असे या महिलेच नाव आहे. ती नेदरलँडला राहते. ही महिला शरीराने एकदम फिट आणि तंदुरुस्त आहे. तिच्याकडे पैशांची अजिबात कमी नाही. तिचा एक बॉयफ्रेंड सुद्धा आहे.त्याच तिच्यावर भरपूर प्रेम सुद्धा आहे. मग, अस असताना जोराया टेर बीकने इच्छामृत्यूची मागणी केली आहे जोराया गंभीर मानसिक समस्यांनी पीडित आहे. तिने ऑटिज्म, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि डिप्रेशन या आजारांचा सामना केलाय. या आजारांमुळे ती इतकी हैराण झालीय की, तिला हे आयुष्य नकोस झालय. म्हणून तिने इच्छामृत्यूची मागणी केलीय.जोरायाने तिच्या या आजारांवर उपचार भरपूर घेतले. पण डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले.हे मानिसक आजार आता जास्त झेलू शकत नाही, म्हणून जोरायाने इच्छा मृत्यू मागितलाय.
रिपोर्ट्सनुसार, पुढच्या महिन्यात मे मध्ये तिच्या इच्छेनुसार, तिला घरात सोफ्यावर इच्छा मृत्यू दिला जाईल. यावेळी बॉयफ्रेंडसोबत असेल. जोरायाची इच्छा आहे की, मृत्यूनंतर तिचा मृतदेह दफन करण्याऐवजी त्यावर अग्नि संस्कार करावेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!