युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलचा दिंडी सोहळा


सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल,वर्ये,सातारा यांच्यामार्फत दि.१६ जुलै रोजी सातारा शहर,लिंब,नागेवाडी,रामनगर(वर्ये),मधुश्री व मातोश्री पार्क (म्हस्वे),जरंडेश्वर नाका(वाढे फाटा) या ठिकाणी ‘आषाढी एकादशीचे’औचित्य साधत ‘दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सकाळी ९:०० वाजता समर्थ मंदिर,सातारा ते राजवाडा बस स्थानकापर्यंत ‘पायी दिंडी व पालखी मिरवणूक’ घेण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांची चार गटात विभागणी करून प्रत्त्येक गटाने वेगवेगळ्या ठिकाणी पर्यावरण, पाणी वाचवा – जीवन वाचवा,गुरू महात्म्य आणि त्यांचा आदर,झाडे लावा – झाडे जगवा व स्वच्छता अश्या विषयांवर आधारित पथनाट्यांचे प्रस्तुतीकरण केले.दिंडी सोहळ्याची संस्कृती जपत सामाजिक जनजागृतीपर हा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी शाळेच्या उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!